8 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - ११९


प्रपंचात सुखी, तोच परमार्थात सुखी. 


समाधान कशानेही आले तरी त्याला कारण नाहीच, असामाधानाला कारण आहे. 


प्रकृती स्वभावतः चांगली - ती बिघडायला कारण आहे. तसे समाधानाचे आहे, (समाधान बिघडायला कारण आहे).


समाधान मिळवायला कारण निर्माण करावे तर ते दुःखाचे होते. आपण कारणामागे जाता उपयोगी नाही. 


प्रयत्न करावा पण जे फळ समाधान बिघडवते ते भगवंतावर सोपवावे. 


फळाची अपेक्षा ठेवली हेच कारण निर्माण करणे आहे. 


प्रयत्नानंतर फळ आले वा न आले दोन्ही वाहवा.


फळाला जास्त महत्व दिले म्हणून समाधान बिघडले.


प्रपंचात ऐश्वर्य प्राप्त झाले तरी त्यात न गुंतता भगवंताकडे लक्ष लागणे महत्त्वाचे आहे. 


आशीर्वाद.

No comments: