8 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


   अमृतधारा - १२०.


संस्कार सर्वात खोल जातात. अनुग्रह हा एक संस्कार आहे. अनुग्रहाने थोडी जबाबदारी उत्पन्न होतेच. देण्या-घेण्यास तसे महत्व नाही. 


अनुग्रह कोणाकडून घ्यायचा ते महत्वाचे नाही. तो संस्कार आहे. त्याने "मी भगवंताचा आहे" ही जाणीव होते. 


आपण सर्व भगवंताचे आहोत, पण ती जाणीव अनुग्रहाने होते. ती जाणीव महत्वाची आहे. 


अनुग्रह घेतल्यावर त्याला म हणजे सद्गुरुला कमीपणा येईल असे वागू नये. 


त्यासाठी साधकाने फार सावधगिरीने वागले पाहिजे. 


प्रत्येक गोष्ट आपल्याला ओढून घेत आहे. आचार विचारांचा परिणाम होतो म्हणून सांभाळले पाहिजे. 


आशीर्वाद.

No comments: