4 Feb 2025

 ☘🍁श्रीराम समर्थ🍁☘


     अमृतधारा - ११४


नामाने मनुष्य नीतीमान होईल. नामाने विषयाची सत्ता नाहीशी होत नसेल तर त्याचा काय उपयोग? पण ते घ्यायला पाहिजे. 


शक्यतो धर्माचे रक्षण करा. नीतीचे प्राणाबरोबर रक्षण  करा. धुगधुगी आहे तोवर नाम घ्या, व सुखी व्हा. 


धर्माने व नीतीने वागणे वा अन्यथा वागणे यात आपण व्यवहार खराच मानतो. भगवंताला स्मरून सर्व गोष्टी कराव्या व वागावे असे संत सांगतात. 


मी भगवंताचा, भगवंताकरता आहे असे मानावे. ते होण्याकरता स्मरण महत्वाचे आहे.


त्यासाठी नीतीची फार गरज आहे. ती तीन प्रकारची आहे. परस्त्री, परद्रव्य, व परनिंदा यापासून दूर रहावे. 


पश्र्चात्ताप होईल असे करू नये. पण चुका झाल्यावर पश्र्चात्ताप होईल, तोच खरा तयार होईल.


आशीर्वाद

No comments: