4 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧

     

    अमृतधारा - ११३


नीतीने व धर्माने वासनेला आळा पडतो. तिला तोंड वर काढू देत नाही. 


अनुसंधानाने व संतसंगतीने वासनेचा क्षय होतो.


मोह येतो तेव्हा आवरत नाही म्हणून प्रसंग टाळावा. 


थोडातरी नियम ठेवावा, थोडक्याने मोठे काम होते. 


नेम थोडावेळ तरी वासना बाजूला करतो. 


आग्रह धरला तर वासना वाढते.


परमात्मा कर्ता ही भावना ठेवणे जरूरी आहे. 


भगवंत जे करील तेच कल्याणाचे आहे असे मानण्यात वासनाक्षय आहे. 


संत सांगतात तसे वागावे. कां ? असे विचारू नये.


आशीर्वाद.

No comments: