4 Feb 2025

 ❗💧श्रीराम समर्थ💧❗


  अमृतधारा - ११२


दास्यत्वाचे खरे लक्षण म्हणजे आपण आपलेपणाने शिल्लक न राहणे. मालकात सामील होऊन जाणे, हे होय.


प्रत्येक माणसाच्या ठिकाणी दास्यत्व व स्वामित्व करण्याचा गुण आहे. पण कोणाचे दास्यत्व व कोणाचे स्वामित्व करायचे ते ठरवले पाहिजे. 


मारूतीने सांगितले की दास्य एका भगवंताचेच करावे. ते केले तर इतर गोष्टीवर स्वामित्व गाजवता येते. त्याच्या उलट विषयाचे दास्य जो करील, त्याला कशाचेच स्वामित्व प्राप्त होणार नाही. 


भगवंताचे दास्य करण्यासाठी कर्तव्य करून भगवंताच्या स्मरणात राहावे. कर्तव्यात स्वतःचा विसर आहे. तेच खरे दास्य. 


ज्याला जे आवडते ते देणे हीच सेवा व हेच दास्य. मारूतीला दोन गोष्टी आवडतात भगवंताचे नाम आणि कर्तव्याचे आचरण. 


म्हणून कर्तव्याला सोडू नका व भगवंताला विसरू नका. 


कर्तव्यात भगवंताचे स्मरण करणे हे मारूतीला आवडते.     "तुला आवडेल ते मला दे" अशी त्याची प्रार्थना करावी. 


मारूतीला नाम आवडते, स्मरण आवडते, त्याकरता नाम घ्यावे. 


आशीर्वाद.

No comments: