30 Jan 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


   अमृतधारा - १११


अंतरी राखावे समाधान, मुखाने भगवंताचे स्मरण, हेच जीवनाचे सार्थक जाण।


देह प्रारब्धाचे आधीन, पण जपणे आपले कर्तव्य जाण।


न करावी हेळसांड, पण लोभांत न राहावे आपण।


लक्ष ठेवावे रामापायी याहून दुजे न करणे काही। 


मुखाने म्हणावे रामराम,  अंतरी असावे निष्काम।


चित्ती भगवंताचे ध्यान, होता स्वतःचे विस्मरण।


परमात्म्यास  व्हावे अर्पण,  साधनात हेच उत्तम साधन।


राखावे सर्वदा समाधान, रामास जावे अनन्य शरण।


अखंड भगवंताचे स्मरण, नामाविण जाउ न द्यावा क्षण।


आपण रहावे रामार्पण, याहून अन्यसेवा नाही जाण।


नामस्मरण, कृपा  करील  रघुनंदन।


आशीर्वाद.


No comments: