29 Jan 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा -११०


वासना चांगली किंवा वाईट राहते. ती निःशेष होण्याकरता देहबुद्धी गेली पाहिजे. 


त्यासाठी शास्त्रमार्ग, उपासना इत्यादी आहेत. 


मनुष्याचा स्वभाव असा की धर्मशास्त्रे काही सांगोत आपण व्यवहारातले नियम सोडीत नाही. 


अंतःकाळी जो स्मरण करतो त्याचा भगवंत उद्धार करतो ते साधणे कठीण आहे. 


माणसाला म्हणजे जीवाला तीन संधी असतात.

1) जन्मकाळची -- 

ती मिळणे कठीण असते. पण भाग्याने मनुष्य देह मिळाला.

 

2) आयुष्याची -

वास्तविक अंतःकाळ  साधण्यासाठी जन्म येतो.


3)अंतःकाळची - 

जीवनामध्ये भगवंताचे स्मरण महत्वाचे आहे. त्याकरता सर्व जन्म घालवला पाहिजे. 


अंतःकाळ चांगला व्हावा हेच महत्त्वाचे असते, पण बाकीचा सर्व काळ चांगला घालवला तरच ते जमते. 


सर्व त्याच्यावर सोपवले तर नामस्मरण ही तोच करील. 


आशीर्वाद.

No comments: