💧❗श्रीराम समर्थ❗💧
अमृतधारा - १०९
इष्टाची अप्राप्ती व अनिष्टाची प्राप्ती हेच दुःखाला कारण होय.
हवे + नको = वासना. वासना दुःख मूळ आहे.
वासनेत आपण जन्मतो. म्हणजेच आपला जन्म दुःखात आहे. वासना मेल्याविना सुख नाही.
वासना अत्यंत सूक्ष्म असल्याने ती दाखवता येत नाही. पण ती दुःख निर्माण करते.
जन्माची वासनेची खोड मेल्यानंतरही पुढच्या जन्माकरता राहते. सत्संग उपासना वगैरे वासना जाण्याकरता आहेत.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment