18 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


   अमृतधारा - १२९


आपण चांगले वागलो तर पन्नास टक्के दुःख कमी होईल बाकी पन्नास टक्के भगवंत सांभाळतो. 


पण आपण पन्नास टक्के वागलो नाही तर भगवंत जबाबदारी घेत नाही. 


इंजेक्शन  (pain killer) दुःखाची जाणीव नाहीशी करते पण मागून दुःख वाढते.


तसे ऐश्वर्य वगैरे दुःख विसरण्याकरता आहे ते नाहीसे करण्याकरता नाही. ऐश्वर्य गेले म्हणजे दुःख तीव्र होते.


समाधान ही भगवंताची खरी देणगी आहे. 


पुष्कळ पैसा मिळाला की पुष्कळ समाधान मिळते असे नाही. 


समाधान पैशावर अवलंबून नाही. परमेश्वर देईल त्यात समाधान मानावे. 


आशीर्वाद.

No comments: