18 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


     अमृतधारा - १२८


सुख खरे माझ्यातच आहे व त्यातूनच ते जन्मले पाहिजे. 


समाधान आतूनच निर्माण झाले पाहिजे. 


जगाची अपेक्षा बाळगली तर समाधान कधीच मिळणार नाही. जगाची अपेक्षा सोडल्याशिवाय भगवंताचे दास होता येणार नाही. 


जो भगवंताचा दास झाला तो जगाचा स्वामी म्हणून मिरवला. 


जो स्वतःचा मालक होईल तोच जगाचा मालक होईल. 


रामदासांनी स्वतःला रामाचा दास म्हटले पण जगाचे स्वामी झाले. 


आपल्याला जगाची आस सोडता येत नाही. म्हणून भगवंताचे दास व्हावे तर जगाची आस सुटेल. 


त्यासाठी भगवंताचे स्मरण पाहिजे व त्याकरता नाम घ्यावे. 


नामच याचे बीज आहे त्यातून परमार्थ येतो. 


त्यासाठी फार पोथी नको पण हे समजायला थोडी पोथी (वाचन) पाहिजे. 


आशीर्वाद.

No comments: