💧❗श्रीराम समर्थ❗💧
अमृतधारा - १२७
कोणा एकावर विश्वास ठेवावा. बुध्दीपूर्वक विश्वास ठेवावा व मग सोडू नये. त्याने समाधान मिळेल.
समाधानाशिवाय सर्व वैभव, ऐश्वर्य फुकट आहे.
सर्व ऐश्वर्य येईल, बाहेरचे सुख येईल, पण हुरहुर राहिलच. ती भगवंताशिवाय जाणार नाही.
सगुणोपासना करून अनुसंधान लक्षात ठेऊन वागेल त्याला साधेल .
त्याच्या आड येणारे बाजूला सारले, अनुकूल ते अनुसरले तर भगवंत प्राप्त होईल.
जगाची सोडावी आस। व्हावे भगवंताचे दास ॥
भगवंताला प्रतिकूल ते सोडणे ते वैराग्य. अनुकूल ते घेणे तो विवेक.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment