14 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


   अमृतधारा - १२६


आपण ध्येय ठरवले पाहिजे. ते समोर ठेऊन त्याप्रमाणे वागले पाहिजे. 


ध्येय स्वतःच्या बुध्दीने तरी ठरवावे किंवा दुसर्‍यावर विश्वास ठेवावा. 


पहिले आपल्याला शक्य नाही कारण ते आजवर कळले नाही. 


म्हणून समर्थांसारख्यांवर विश्वास ठेवावा. ते म्हणतात, भगवंत आपले ध्येय आहे. 


प्रपंचाला जरासुद्धा धक्का न लावता भगवंतप्राप्तीचे ध्येय समोर ठेऊन राहता आले तर काय हरकत आहे? 


भगवंताच्या ध्येयाकडे लक्ष ठेवून प्रपंच केला, व्यवहार केला तर पूर्णत्व येईल.


ज्याची भगवंतावर पूर्ण निष्ठा आहे, त्यालाच भगवंताचे स्मरण साधेल. मग प्रपंच त्याला खेळासारखा होईल.


आपण रिकामपणाच्या वेळी जो खेळतो तो खेळ होय. त्याप्रमाणे भगवंताच्या स्मरणात जो रिकामा वेळ मिळेल त्यामधे निष्ठावान मनुष्य प्रपंच करील. 


आशीर्वाद.

No comments: