💧❗श्रीराम समर्थ❗💧
अमृतधारा - १२५
(आपल्याला) वस्तू नको, पण काय पाहिजे ते कळत नाही. माणूस करमणूक करून घेतो, पण खरा आनंद मिळत नाही.
बाहेरच्या सुखाची साधने आली. पण त्याने देहाचे सुख वाढले व परावलंबीत्व आले.
जेथे परावलंबित्व असते तेथे समाधान कमी असते.
पण ही सुखाची साधने व व्यवहार टाळता येणार नाहीत. मग त्यात (अलिप्तपणे) कसे राहायचे ते ठरवले पाहिजे.
व्यवहारातील सर्व गोष्टी स्वप्नातील राज्य व भिकारी यासारख्या आहेत पण भगवंत जर त्यात नसेल तर सौभाग्य तिलकाशिवाय असणाऱ्या बाईप्रमाणे आहे. असे सर्व संत सांगत असता त्या भगवंताच्या अस्तित्वाबद्दल शंका घेणे किती वाईट आहे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment