18 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - १३०


मनुष्याचे वागणे चांगले असले तरी त्याचा चांगलेपणा कृतीपेक्षा हेतूवर अवलंबून असतो. कृती विपरीत असली तरी हेतू चांगला असावा.


हेतू पाहता काही स्वभाव पूर्व जन्मार्जित असल्यास दोष मानू नये. पण हेतू बदलता येतो.


विचार, शिक्षण, परिस्थिती, संगत ह्यांनी हेतू बनतो, म्हणून तो बदलता येतो. आपण चांगला हेतू ठेवू. कार्यास तितके महत्व नाही.


मीच सुखी व्हावे, जगाचे काही होऊ दे,  हा काही चांगला हेतू नाही. जग सुखी राहावे म्हणण्यात मोठेपणा आहे. 


एखाद्या नीट बांधलेल्या विहिरचे पाणी खारट आहे, पण न बांधलेल्या विहिरीचे पाणी गोड आहे. तसे बाहेरचे चांगले असले तरी आत वेगळे असेल.


मी खरा कसा आहे ते माझे मला जास्त कळते. पण मी नाही तेच दाखवतो. मी मला झाकून ठेवतो.


आपला हेतू चांगला ठेवण्यास भगवंताला सांगावे. भगवंताचा हेतू हाच सगळ्यात चांगला हेतू.


आशीर्वाद

No comments: