💧❗श्रीराम समर्थ❗💧
अमृतधारा - १३१
परमार्थ सोपा, कारण त्यात गमवायचे असते. प्रपंच कठीण कारण त्यात मिळवायचे असते.
मी कोणाचाच नाही हे गमावणे म्हणजे परमार्थ. मी पुष्कळांचा आहे हे मिळवणे म्हणजे प्रपंच.
भगवंताचे प्रेम नाही म्हणून परमार्थ कठीण वाटतो. त्याचे प्रेम नाही म्हणून सर्व अडचणी येतात.
गोपी अशिक्षित होत्या. पण त्यांच्याइतके भगवंताला कोणी आपलेसे केले नाही.
जे प्रेम पाहिजे ते प्रेम लागत नाही, म्हणून विषयाचे प्रेम लागते. भगवंताचे प्रेम लागले की इतर प्रेम लागणार नाही.
भगवंताचे प्रेम आले की त्याच्याशी कसे वागावे हे कळेल. ते प्रेम येण्यास नामस्मरण ठेवावे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment