20 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - १३२


आत्मकल्याण हे खरे कल्याण आहे. बाकी वैभव, ऐश्वर्य खरे कल्याणाचे नाही. 


प्रपंचातले आपल्या हातात काही नाही. चांगले-वाईट पण हातातले नाही. 


भगवंत ठेवील त्यात समाधान टिकवणे हेच खरे. 


समाधान हे सर्वात मुख्य आहे. समाधान असून इतर कमी  असेल तर चालेल. 


पण समाधान नसून इतर सर्व असेल तर काय उपयोग?


परमात्मा हा सगळ्या चांगल्याचा पाया आहे. 


अक्षय  टिकणारी वस्तु भगवंताशिवाय अन्य नाही, अन्य असूच शकत नाही.


ज्याप्रमाणे "मी देहाचा आहे" अशी घट्ट समजूत झाल्याने आपण देहाशी तद्रूप बनलो, त्याप्रमाणे "मी भगवंताचा आहे", "मी रामाचा आहे" असे म्हणत गेल्याने आपण भगवद्रूप बनून जाऊ. 


आशीर्वाद .

No comments: