22 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


   अमृतधारा - १३३


प्रपंच सुटीसारखा करावा. कामाचे दिवसापेक्षा सुटी बरीच कमी असते. तसा प्रपंच केला तर सुखाचा होतो.


जेवणात मिठाशिवाय चव येत नाही. पण मीठ फार झाले तर सारे अन्न खराब होते. तसे मिठाच्या चवीपुरता प्रपंच केला तर सुखाचा होतो.


प्रपंच सुखाचा, आनंदाचा होण्याकरीता परमार्थ करावा,  देवाकरीता परमार्थ नसावा. तो नित्य संतुष्ट आहे.


आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो. आपला असा करतच नाही. सर्व मिळवतो आणि ते सर्व इथे ठेवून जावे लागते.


आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच. भगवंताच्या स्मरणात जेवढा झाला तेवढाच आपला प्रपंच. 


प्रपंचात पैसा मिळून जे मिळाले नाही ते नामाने मिळेल. म्हणून तुम्ही नित्य नाम घ्या व आनंदात रहा.


आशिर्वाद.

No comments: