22 Feb 2025

 🌺❗श्रीराम समर्थ❗🌺


   अमृतधारा - १३४


श्रीरामाने कर्तव्याला महत्व दिले. प्रत्येक प्रसंगात कर्तव्य कसे करावे ते दाखविले.


कृष्णाच्या जन्मापासून त्याच्यावर संकटे आलीत. संकटाला तोंड देऊन धर्म, निती राखून धैर्याने वागणे हे त्याने केले.  


आपण संकटात धीर न सोडता दुस-याला पार केले.


प्रपंच संकटाचा आहे. कृष्णाच्या पायाने नदी (यमुना) ओसरली. भगवंताच्या आधाराने संकटे जातात.


शिपायाच्या मागे शक्ती असते. तसे प्रत्येकाच्या मागे भगवंताची शक्ती असावी. ती नामाचे स्मरण केल्याने येते.


जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल, आणि संत त्याला भगवंताची प्राप्ती बरोबर करून देईल. त्याचे कोठेही अडणार नाही.


मनात नसतानाही नाम घेतले तरी काम होते. नाम घेणे मात्र जरूर आहे. 


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: