26 Feb 2025

 🌸❗श्रीराम समर्थ❗🌸


   अमृतधारा - १३५


सर्व धर्म पाळणे (धर्मशास्त्राप्रमाणे वागणे) शक्य नाही, पण नीती पाळावी. याकरिता भगवंत पाहिजे.


शाळेत पुस्तके (पुस्तकी ज्ञान) शिकवावी. पण नीती (सुद्धा) शिकवावी. 


आपल्या सर्वांना खडतर  तपश्चर्या कठीण असते, पण  ते साधन पुष्कळांनी केले.


प्रपंचात नियमाने राहून अनुसंधान टिकवणे हे दुसरे साधन होय. पण प्रपंच करणे व अनुसंधान टिकवणे हे विरुद्ध. म्हणून हे ही साधन (जरा) कठीण आहे.


नाम हे परीपूर्ण आहे. त्याला कशाचीही जोड लागत नाही. (नामस्मरण हे साधन तसे सोपे आहे. म्हणून नित्य नेमाने ते करावे).


जो देवाचे नाव घेतो तो कोणाचाही असला तरी मला आपलाच वाटतो.


जेथे राम, तेथे सर्व काम होते.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: