🌸❗श्रीराम समर्थ❗🌸
अमृतधारा - १३६
अमुकच व्हावे असे म्हणणे कठीण. पण होईल तसे होऊ दे म्हणणे सोपे होईल. त्यात सामिल होणे अधिक सोपे व चांगले आहे.
पहिल्या दोन्हीत माझ्या मनासारखे सर्व करून घेणे जरूर असते व ते कठीण आहे.
वृत्ती सांभाळणे फार कठीण आहे. म्हणून होईल तसे होऊ द्यावे. ही सवय लावली पाहिजे.
होईल तेच कल्याणाचे आहे, हे म्हणणे सोपे आहे. असे वागण्याने सर्व बिघडेलच असे नाही.
दुसरे म्हणजे (नेहमी) मनासारखे होतेच असे नाही.
म्हणून आली परिस्थिती ती भगवंताच्या इच्छेने आली आहे असे वाटून अनुसंधानात रहावे हे सर्वात चांगले.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment