15 Jan 2025

 🙏🏼💧श्रीराम समर्थ💧🙏🏼


      अमृतधारा - ९३


गोंदवल्यात पैसा रुजत नाही पण प्रेमाचे पीक चांगले रुजते. गोंदवल्याचा व्यवहार सर्वस्वी उलटा आहे. येथे जेवायला येणारा भिक्षेकरी मोठा. शिव्या सहन करील तो मोठा.


देहसंबधामध्ये स्वार्थ आलाच. तो येथे विसरला पाहिजे. येथे प्रेमाने नाम घ्या. द्वेष मत्सर उपयोगी नाही. 


जो लोकांचे सहन करून प्रेम करील तो येथे मोठा होईल. ही संधी मिळणे कठीण आहे.


येथे मोठय़ांवर अधिक जबाबदारी आहे. येथे सर्व करुन निंदा सहन करावी लागते. पण हेच इथे शिकायचे आहे. 


परनिंदा करणारे नसले तर बाहेरून आणून ती सहन करायला शिकावे लागेल. 


त्याचा मोबदला अद्रुश्य आहे. पण समाधान रूपाने मिळेलच. कोणी कितीही राहूदे पण तो नामात राहावा.


आशिर्वाद.

No comments: