🍁💧श्रीराम समर्थ💧🍁
अमृतधारा - ९२
सृष्टीक्रम नाशवंत मानून राहणे हा विचार बाळगला पाहिजे. प्रापंचिक गोष्टींनी हानी झाली असे मानू नये.
माझा आनंद भगवंतावर आहे. इतर गोष्टींवर नाही असे वाटावे.
आमचा स्वभाव आमच्या विचाराने गढूळ झाल्याने मूळ आनंद नाहीसा झाला आहे.
सर्वांचे चांगले व्हावे हा हेतू चांगला. तो हेतू ठेवावा हा मूळचा झरा.
सगुणाचे प्रेम आहेच पण तो खरा विचार नाही.
विचार ही मोठी शक्ती आहे. त्याच्या जोरावर भगवंत कर्ता मानून समजून समाधानात रहावे.
भगवंताचे कर्तेपण विचाराने ठरवावे. तो कर्ता आहे ही खरी भावना ठेवली तर दुःख नाहीच.
"भगवंत माझ्या घरातला धुरीण (चालक, पालक व मालक) आहे. तो सर्व कल्याणाचे करतो, त्याच्या इच्छेने सर्व होते" ही भावना ज्याची आहे तो भक्त खरा.
हाच परमार्थ. हा चोवीस तासांचा आहे, थोड्या वेळेपुरता नाही.
आशिर्वाद
No comments:
Post a Comment