💧❗श्रीराम समर्थ❗💧
अमृतधारा - ९४
क्षेत्राला शून्य होऊन म्हणजे मी कोणी नाही म्हणून जावे. अनन्यतेने जावे.
जो मी कोणीतरी म्हणून जातो तो काहीतरी होऊन परत येतो. एकच गोष्ट करावी की खेळीमेळीने राहावे.
प्रत्येक गोष्टीचा मोबदला असतो. भगवंताच्या सेवेचा मोबदला तोच देऊ शकतो, इतर कोणीही नाही.
पण ती सेवा होते का? इतर कोणी करणार नाही ते करणे ही त्याची सेवा.
भगवंताच्या कामात अनेक विघ्ने येतात ते पार पडणे ही त्याची कृपा असते. ते पार पडले तर देहपातापर्यंत त्याची सेवा व्हावी हे मागावे.
ऊत्सव म्हणजे भजन आणि भोजन. भोजन आपले आपल्यालाच केले पाहिजे. भजन दुसर्याचे ऐकता येते. ऐकण्यातच अधिक आनंद आहे.
अतिथीला अन्नाची अपेक्षा असते. आपण त्याला भगवद्रूप समजून ते देणे ही त्याची सेवा.
ज्याला थोडे; त्याचे महात्म्य समजेल तो धन्य .
आपले घर आल्यागेल्याचे असावे. भगवंताचे स्मरण असावे.
परमात्मा (महाराज) द्यायचे तेच देतो, पण आपण हवेपणाने गेलो म्हणजे त्याचे दातृत्व विसरतो.
आशिर्वाद
No comments:
Post a Comment