🌸💧श्रीराम समर्थ💧🌸
अमृतधारा - ९५
आपल्या सुवासासाठी अत्तर लावले ते लोकांना सुवास देईल तर बिघडले कोठे?
प्रपंचातील लाभहानीला समाधान बिघडेल इतके महत्व देऊ नये.
नुकसान झाले असता ज्याने समाधान टिकवले त्याने जिंकले. पैशाने जिंकणे खरे नाही.
प्रपंचातील लाभहानी इतकी महत्वाची नाहीत. वेळेवर सावधानता बाळगण्यात शहाणपणआहे.
परमात्म्याची सत्ता मानली तर तो करतो ते कल्याणाचेच मानले पाहिजे. भगवंताचा विसर पडू न देणे ही सद्बुद्धी होय.
देवाचे नाव तोंडात येणे हा खरा मोठा लाभ आहे. प्रेमाने भगवंताचे नाम घेणे हाच सगळा परमार्थ.
आशिर्वाद,
No comments:
Post a Comment