27 Jan 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


     अमृतधारा - १०६


प्रपंचाचे कर्तव्य करताना स्मरण करावे,  तेच स्वर्गसुख. 


जसा ज्याचा भाव तसा त्याला अनुभव येतो, पण  अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 


बहुतांनी चांगले म्हटले म्हणजे भगवंताला आवडल्यासारखेच आहे. 


आपली काळजी आपण केली तर भगवंत आपली काळजी करीत नाही. 


मला परमात्मा सांभाळणारा आहे ही निष्ठा बाळगावी. तो उचलून घेतोच, हाच परमार्थ. 


आपण सर्वस्वाने भगवंताचे झाल्यावर त्याला काळजी घ्यावीच लागते. 


मनाने त्याचे झाल्यावर काळजीला कारण राहतच नाही. 


मग भगवंताला आवडेल ते करणे हेच परमार्थाचे रूप होते. तसे केले की आपण जबाबदारीतून मोकळे होतो. 


आशीर्वाद.

No comments: