❗💧श्रीराम समर्थ💧❗
अमृतधारा - १०५
प्रारब्धाचे भोग येतील पण :-
1) अखंड स्मरण ठेऊन
2) भगवंताच्या प्राप्तीचे
ध्येय ठेऊन
3) सर्व नात्यात कर्तव्याप्रमाणे राहिले तर आनंद येईलच.
सहवासाचे प्रेम राहील पण स्वार्थाचे राहणार नाही.
माणूस वैभवाने नखशिखांत मढला तरी भगवंताच्या प्राप्तीविना वाया गेला.
गेलेला माणूस कितीही कल्याणाप्रत गेला तरी आपण देहबुद्धीच्या स्वार्थाने दुःख करतो.
जोवर कर्तेपण गेलेले नाही व भगवंत कल्याणाचे करतो असे वाटत नाही तोवर दुःख राहणारच.
दुःखाचा रोग सर्वांनाच झाल्याने तो रोग वाटत नाही.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment