27 Jan 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


 अमृतधारा - १०४


आपले जीवन भगवंताच्या हाती देऊया. भगवंताच्या प्राप्ती करताच देह दिला आहे. 


भगवंत विघ्ने निर्माण करत नाही, आपण ती निर्माण करतो.


भीती वगैरे भगवंताला जमली नाही, ती कामे आपण केली.


आपल्या प्रारब्धाच्या दो-या आपण भगवंताच्या हाती देऊ. आपण कर्तव्यापुरते राहू.


तो ठेवील तसे राहावे मग आनंद दूर नाही. 


आपण सर्व भार भगवंतावर घालूया.


मी कर्ता असे वाटते, तोपर्यंत नामस्मरण पाहिजे (राम कर्ता वाटेपर्यंत).


आशीर्वाद.

No comments: