22 Jan 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


  अमृतधारा - १०३


प्रपंचातही आनंद राहतो असे संत  सांगतात. 


एकात दुःख नाही. जेथे दोन तेथे दुःख. 


एका विचाराची कितीही माणसे एकच असतात. तसे भगवंताहून वेगळे राहिले तर दुःख नाहीतर आनंदच असतो.


"भगवंताशी एकमत झाले" असे वाटले पाहिजे. आनंद द्वैतात नाही. आनंद पाहिजे म्हणजे भगवंत पाहिजे. 


भगवंताच्या इच्छेच्या विरूद्ध असणे म्हणजे दुःख. 


भगवंताच्या विरूद्ध जाणारी शक्तीच नाही. म्हणून तो करील ते कल्याणाचेच म्हटले तर सुख लागेल. त्याने समाधान टिकेल. तो ठेवील त्यात राहणे हेच समाधान. 


आशीर्वाद.

No comments: