21 Jan 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


     अमृतधारा - १०२


भगवंत आहे म्हटले तर आनंदरूपच राहिले पाहिजे. 


दुःख वाटले तर माझा स्वार्थ आहे असे समजावे. 


सबंध आयुष्यात गाढ झोपेशिवाय सुखाचा क्षणही सापडत नाही. 


भगवंताला सोडून आनंद कसा मिळेल? 


जगण्याला आनंदाची फार गरज आहे इतका तो स्वाभाविक आहे. 


गिळणे जसे अगदी स्वाभाविक आहे, तशी आनंदाची हाव सर्वांना अगदी स्वाभाविक आहे. 


आनंद श्वासोश्वासाइतका स्वाभाविक आहे. 

आनंदाला कारण नाहीच. 


भगवंत कर्ता आहे ह्या भावनेने जो राहिल त्याला आनंदाहून वेगळे राहताच येणार नाही. 


ती भावना येण्यासाठी नाम घ्यावे. 


आशीर्वाद.

No comments: