💧❗श्रीराम समर्थ❗💧
अमृतधारा - १०१
भगवंत सर्वांचा कर्ता आहे तर त्याच्या इच्छेच्या आड कां यावे. ते येणे म्हणजे मोहाला बळी पडणे होय.
तीन कारणे दुःख होण्याची सांगता येतील.
1) भगवंताचे विस्मरण
2) त्याच्या कर्तेपणाचे
विस्मरण
3) त्याच्या कल्याणपणाचे विस्मरण (भगवंत आपला कल्याणकर्ता आहे)
हे दुःखाचे मूळ आहे.
भगवंताचे कर्तेपण विचाराने ठरवावे. तो कर्ता आहे ही खरी भावना ठेवली तर दुःख नाहीच.
भगवंताला कर्ता मानल्यावर आपले कर्तेपण कर्तव्यापुरते राहील. त्यात फळाची अपेक्षा राहणार नाही.
आशीर्वाद
No comments:
Post a Comment