❗💧श्रीराम समर्थ💧❗
अमृतधारा - ८५
भगवंत आपलासा करून घेतला तरी व्यवहार थांबत नाही. पण भगवंतावाचून काहीच पहायचे नाही.
"जे होते ते त्याच्याच इच्छेने होते".
म्हणून घडणाऱ्या गोष्टी आनंदाच्या व कल्याणाच्या आहेत असे वाटले पाहिजे. ते (भगवंताच्या इच्छेने घडते) आनंदमयच आहे, असले पाहिजे.
स्वतःला कदाचित ते आवडणार नाही पण जे घडते ते कल्याणाचेच आहे असे निःसंशय वाटले पाहिजे.
घडणारी गोष्ट आनंदमय आहे असे मानणे व ती तशी निश्चित आहे असे वाटणे यात फरक आहे.
तसे सहज वाटले पाहिजे. ही वृत्ती येण्याकरता भगवंताचे होऊन राहिले पाहिजे.
"सर्व त्याच्या इच्छेने आहे" ही वृत्ती बाणली पाहिजे. हे अनुभवाचे शास्त्र आहे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment