🍁💧श्रीराम समर्थ💧🍁
अमृतधारा - ८४
पावसाच्या पाण्याइतके स्वच्छ पाणी नाही. तसे भगवंत ठेवील तसे राहणे सोईस्कर वा आनंददायक आहे, इतर नाही.
आपल्या विचारांनी व व्यवस्थेने आपण गुंतागुंत करतो.
देहाला सुख देऊन मनाला सुख येणार नाही. जग अखंड आनंद देणारी वस्तु नाही. आपल्या स्वार्थाकरता दुसर्याचे नुकसान करू नये.
ज्याने आजवर सांभाळले तो पुढे सांभाळील असे म्हणल्यावर भीती नाहीच.
समाधान मनाचा धर्म आहे. मन भगवंताशी चिकटवले तर समाधान येईल.
आनंद भगवंतापासून वेगळा नाही. तो त्याच्यातच आहे, म्हणून तोच आपलासा करून घेतला पाहिजे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment