2 Jan 2025

 ❗💧श्रीराम समर्थ💧❗


      अमृतधारा - ८३


भगवंताकरता मी आहे हे अनुसंधान राहण्याकरता "आनंद त्याच्यावाचून कोठे नाही " हे स्मरण पाहिजे. 


ते राहण्याकरता ती अवस्था मुरून जाण्याकरता नाम घेणे जरूर आहे. 


प्रपंच सुखही देत नाही व दुःखही देत नाही. 


दोन गोष्टी अपायकारक आहेत, 

१) फार  लोभ 

२) कंटाळा 

ही दोन देहबुद्धीची लक्षणे आहेत.


क्रिया करावी पण बाधा न होईल असे वागावे. हेतु असेल तर क्रिया बाधक होते. 


देव ठेवील तसे राहणे, फार विचार न करता राहणे हाच परमार्थ. 


भगवंताच्या निष्ठेने मोठे समाधान व निवांतपण येते,(त्यासाठी निरंतर नाम घ्यावे).

  


आशीर्वाद.

No comments: