2 Jan 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


      अमृतधारा - ८२


प्रपंचात राहून भगवंताला आवडेल तसे वागावे. 


प्रपंचात कर्तव्यापुरते राहून फळाची अपेक्षा न ठेवता राहिले तर बाधा होणार नाही व परमार्थ तर होईलच. 


अपेक्षाच नाही तर बंधनच नाही. मग प्रपंचात राहिले तर बाधा नाही व न राहिल्यासारखे होईल. 


भगवंतावर भरवसा ठेवला तर तो आनंदरूपच असल्याने वस्तु विरहित आनंद देईल. 


म्हणून "भगवंताकरता मी आहे" असे मानून राहिले तर आनंदच होईल.


प्रपंचात कर्तव्याची जागृती, परमार्थात भगवंताची स्मृती असा प्रपंच परमार्थच होतो. 


आशीर्वाद.

No comments: