6 Jan 2025

 ☘💧श्रीराम समर्थ💧☘


     अमृतधारा - ८६


निस्वार्थीपणाचे फार सोंग आणू नये, ते शेवटपर्यंत टिकत नाही. 


जगात कितीही घडामोडी झाल्या तरी मनाची वृत्ती स्थिर राहिली पाहिजे. 


आपले जीवन प्रारब्धाच्या गतीने चालते. व्हायचे तेच होते, म्हणून भगवंताच्या हाती सूत्रे देऊन राहावे. 


सर्व कर्तुत्व भगवंताकडे सोपवून राहिले तर सुखदुःख भासणार नाही. 


भगवंताच्या इच्छेने वागत नाही ही चूक होय.


रामकर्ता ही भावना वाढवली पाहिजे. ती भावना जितकी वाढेल तितके माझे कर्तेपण नाहीसे होईल. 


मग तो करतो ते चांगलेच करतो असे मला वाटू लागेल. 


आशीर्वाद.

No comments: