☘💧श्रीराम समर्थ💧☘
अमृतधारा - ८७
"भगवंत + नाम + मी" हा त्रिवेणी संगम आहे.
भगवंत व नाम निरूपाधिक आहेत. मी तसे झाले पाहिजे.
नाम सर्वात निरूपाधिक आहे, आपण त्याच्यासारखे झाले पाहिजे.
"मी नसून तूच आहेस" हीच उपासना. तेच अद्वैत आहे. त्यात देव नाहीसा होत नाही तर मी नाहीसा होतो.
देह काहीच करत नाही, आपणच उपाधी वाढवतो.
उपाधी सोडाव्या किंवा त्यांच्यात भगवंत पाहावा. मग ती उपाधीच नव्हे.
शरीरावस्था टिकत नाही पण मनाची अवस्था टिकते. परंतु मनाला विश्रांती पाहिजे.
मनाला विश्रांती उपाधीरहित राहण्यात आहे. त्याकरिता सतत भगवंताचे स्मरण पाहिजे.
साधन कोणतेही असले तरी भगवंताचे स्मरण हेच सर्व साधनाचे वर्म आहे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment