🙏🏼🌹श्रीराम समर्थ🌹🙏🏼
अमृतधारा - ६९
आम्हाला नड भासत नाही म्हणून प्रेम येत नाही. पण जरूर भासते.
नड उत्पन्न होण्याकरता अभ्यास पाहिजे, त्याकरता उपासना, साधना पाहिजे.
साधनेबद्दल निश्चितपणा असावा आपण जे करतो त्याची निष्ठा असावी.
त्यापरते करण्याचे शिल्लक नाही अशी वृत्ती म्हणजे श्रध्दा.
साधनेचे फळ असावे भगवंत आणि निष्ठा असावी नामाची.
तो भगवंत कर्ता आहे ही जाणीव निर्माण करणे हे उपासनेचे ध्येय आहे.
"तू आहेस मी नाहीच" हे साधनेचे रहस्य.
प्रत्येक गोष्टीला काही ना काही फळ असतेच. कशाने काही तर कशाने काही मग भक्तीचे फळ काय ?
भक्तीचे फळ भगवंत आहे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment