🍁💧श्रीराम समर्थ💧🍁
अमृतधारा - ७०
ज्या गतीला (पाण्याच्या प्रवाहाला) अडथळा नाही ती शांत जाते (वाहते).
अडथळा आला तर डबकी भरतात, रोग वाढतो.
आपल्यात दोन प्रवाह आहेत. एक आंतर प्रवाह व दुसरा बाहेरचा प्रवाह.
प्रतिकार केल्याशिवाय म्हणजे बाहेरच्या अडथळ्यांशिवाय जीवन अशक्य असते. पण आतून अडथळा नसला पाहिजे.
रक्त वाहिनी थांबली तर कातडी फुगेल. असा अडथळा नसेल तर सुखी. म्हणून अडथळा कमी केला पाहिजे.
तो आपल्यातला असेल तर कमी करता येईल. बाहेरचा असेल तर करता येणार नाही (म्हणून सावधानता ठेवावी).
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment