19 Dec 2024

 🍁💧श्रीराम समर्थ💧🍁


     अमृतधारा - ६८


जे करायचे ते श्रध्देने करावे. आपण संशयाने करतो. संशयाचे ज्ञान समाधान देत नाही. 


म्हणून ज्याने साधन सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवावा. पण त्याने जे सांगितले त्याच्यावर त्याच्याहून अधिक विश्वास ठेवावा. 


किंबहुना नामीहूनही (भगवंत) नामावर अधिक विश्वास ठेवावा. 


भगवंताचे दर्शन बाहेरून यायचे असे नाही, ते आपल्यातच आहे. पण आपल्याला देहाचे व वासनेचे प्रेम अधिक आहे. 


ते काढून टाकायचे म्हणजे साधना. साधनेने आसक्तीचे वेष्टन गेल्यावर आपले स्वरूप दिसते. 


आशीर्वाद.

No comments: