28 Dec 2024

 🍁💧श्रीराम समर्थ💧🍁


    अमृतधारा - ७७


कधी कष्टी होऊ नये. देणे भगवंताचे असते ते कल्याणाचे असते व ते बरे असते. 


सगळ्याच्या वर परमात्मा आहेच व त्याच्याशिवाय आपण जगलेच नसतो.


बरे कर म्हणण्यात त्याची किल्ली नाही, ते त्याच्या हातात आहे. पण कल्याणाचे नाही म्हणून "तुझे स्मरण ठेव" असे म्हणावे. ते त्याच्या हातात आहे, कल्याणाचे आहे. 


आजारातून जाणे हा आयुष्याचा क्रम नाहीच. आजारात आहे तोपर्यंत धोका नाही. सुधारल्यावर मात्र शाश्वती नाही. 


जेथे औषधाने रोग बरा होत नाही तेथे औषध गुणकारी ठरण्यापेक्षा रोगच जोरकस ठरतो. त्याला भगवत्कृपाच पाहिजे. 


पण खरी कृपा ती नव्हेच. भोग कितीही भोगीत असता त्याच्या (भोगाच्या) विस्मरणात समाधान टिकणे ही भगवंताची खरी कृपा होय.


तो (भगवंत) भोग तरी किती नाहीसे करील (आमचे भोग कितीही घालवले तरी शिल्लक राहणारच). पण ते येत असतानाही त्याची जाणीव न राहणे ही त्याची खरी कृपा आहे. 


भगवंताच्या स्मरणात राहिले म्हणजे देहाचे व भोगाचे आपोआप विस्मरण होईल. 


आशीर्वाद.

No comments: