28 Dec 2024

 🌹💧श्रीराम समर्थ💧🌹


    अमृतधारा - ७८


तारुण्य, म्हातारपण ही जितकी सहज व निसर्गक्रमानुसार आहेत तितकाच मृत्यु आहे. त्यात काही वाटू देऊ नये. 


गेलेल्या माणसाला आवडेल असे वागणे म्हणजे ते आहेतच.


देहाने प्रपंच व मनाने (भगवंताचे) स्मरण, असा प्रपंच परमार्थरूपच आहे. 


ज्या एका भगवंतावर सर्व जग अवलंबून आहे, त्याला प्रिय ते सर्वांना प्रियच होते. मग जग आपोआप मागे येते. जगाची पर्वा ही राहात नाही. 


संतांनी पर्वा केलीच नाही पण जग मागे आले.


भगवंताला प्रिय होईल तेच मी करीन ही वृत्ती असणे हाच परमार्थ होय. त्यातून निर्माण होणारा आनंद चिरंतन राहतो.


आशीर्वाद.

No comments: