🙏🏼💧श्रीराम समर्थ💧🙏🏼
अमृतधारा - ७९
चांगले कर्म चांगले म्हणून करणे वेगळे व चांगले म्हणावे म्हणून करणे, वागणे वेगळे.
चांगले वागणे कठीण खरे पण तसे वागणे कर्तव्य म्हणून केले पाहिजे.
देहाने भगवंताची सेवा व मनाने स्मरण हेच खरे चांगुलपण. ते सत्याधार असल्यामुळे कायम टिकेल.
चांगली वस्तू सत्यच असली पाहिजे, तसेच ती आनंदरूपच असली पाहिजे.
पण याहून चांगली सद् वस्तू म्हणजे अखेर भगवंतच चांगला ठरतो.
भगवंताकरता राहतो तोच सर्वात चांगला. तो आनंदीच असणार.
आशिर्वाद.
No comments:
Post a Comment