💦❗श्रीराम समर्थ❗💦
अमृतधारा - २१
वृत्ती सांभाळण्याकरिता काहीतरी निश्चय पाहिजे. वृत्ती थोड्या-थोड्या वेळात बदलते.
आतले फार झाले की बाहेर उमटते. आंतर सांभाळले की बाहेर आपोआप चांगले होईल.
वृत्ती केव्हा कोणाच्या अंतरी उठेल ते सांगता येत नाही. बाहेरचे सांभाळायला जमेल पण आतले कोण पाहिल? ते सांभाळणे फार महत्वाचे आहे.
अंतरंगात वृत्ती उठेल तेव्हा भगवंताचे स्मरण पाहिजे. भगवंत पाठीराखा आहे ही भावना ठेवावी.
आतून वृत्ती बदलणे हा परमार्थ होय.
आशीर्वाद.
💧🌷🌼
No comments:
Post a Comment