31 Oct 2024

 🌸☘ श्रीराम समर्थ🌸 ☘


  अमृतधारा - २०


आपली आनंदाकडे स्वाभाविक ओढ आहे, पण मध्ये आडकाठी आपणच आणतो. 


आपण आनंदाला कारणे निर्माण करतो. कारणाचा आनंद कारणापुरताच टिकतो.


आनंद कारणाशिवाय आहे. पण आपण कारणामागे इतके लागलो की त्यात पांघरूणा खाली गुदमरून जावे तसे आपण गुदमरून गेलो. त्यातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. 


आनंदाचा शोध संतांनी केला. राम कर्ता  मानून नामस्मरणात राहणे हाच आनंदाचा खरा मार्ग आहे.


आशीर्वाद.

🌸☘💦

No comments: