💦❗श्रीराम समर्थ❗💦
अमृतधारा - २२
आपण विषयात इतके गुंतले आहोत की तो (विषय) सोडून जाता येणे शक्य नाही. रक्तात गेलेले विष ओकून जात नाही, तसे प्रपंचाचे विष रक्तात मिसळले आहे.
त्याला रक्तात मिसळणारे इंजेक्शनच हवे. म्हणजे अती सूक्ष्म साधन करायला हवे. ते साधन म्हणजे रामकर्ता ही भावना ठेवून नाम स्मरणात कर्म करावे.
विषयाचा आनंद खरा नाही. वृत्ती विषयाकार होईलच. ती अनावर होते, तेव्हा भगवंताला प्रार्थना करावी.
मागितले तर तो देईलच देईल. तो दयाळू आहे. ज्याच्या कृपेने आपण जगतो, त्याच्याच कृपेने फळ मिळते असे मानावे.
मग प्रत्येक प्रपंच भगवंताचे देऊळ होईल.
आशीर्वाद.🙏🏼
💧🌷🌼
No comments:
Post a Comment