🌸 श्रीराम समर्थ🌸
अमृतधारा - १७८
तरुणपणी कर्तव्य फार महत्त्वाचे असते. म्हणून नीतीचे आचरण व भगवंताचे स्मरण करावे, तर म्हातारपण चांगले जाईल नाहीतर पश्चाताप होतो.
भगवंताचे अनुसंधान ठेवावे आणि पश्चात्ताप होणार नाही असे वागावे.
वयाच्या मानाने दिसत नाही, ऐकू येत नाही. तर मनावर परिणाम होऊ देऊ नये. वय झाल्यावर प्रपंचात अगदी लक्ष घालू नये. सर्व वेळ नामात वेळ घालवावा.
गेल्या साठ सत्तर वर्षानी आपण शहाणे झालो नाही तर अनुभव काय कामाचा?
म्हणून माझे मागणे उरले नाही, "माझे मागणे मी थांबवले, माझे कल्याणाचे ते दे" अशी सकाळी रोज प्रार्थना करावी.
म्हातारपणी आपण अगदी शांत व समाधानी रहावे.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment