8 Apr 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


  अमृतधारा - १७९


दुसर्‍याने काय करावे हे पाहण्यापेक्षा आपण काय करायचे ते पहावे व त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे.


दुसर्‍याने सुख दिले तर मी त्याला सुख देईन हे म्हणणे खरे नाही. दुसरा काय करतो ते पाहू नये.


भगवंताला काही हवे असले तर त्याला काय पाहिजे ते आपल्याकडे असले पाहिजे.


भगवंताला नि:स्वार्थ प्रेम पाहिजे. ते घरात शिकावे. ते शिकले म्हणजे झाले. ते प्रेम व्हायला प्रत्येकाने आपले कर्तव्य पाळावे. 


मुलांनी आई-बापाची आज्ञा पाळावी. बायकांनी पतिपरते दैवत मानू नये आणि आतिथ्य सांभाळावे.


पुरुषांनी कर्तेपणाने वागू नये. सत्तेच्या भावनेने वागू नये. भगवंताने दिलेले म्हणून पोषण कर्तव्य असे मानून वागावे.


भीतीचा आदर नसावा. प्रेमाचा आदर असावा.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: