🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - १८२
प्रत्येकाला भेटेल इतका भगवंत आहे. प्रत्येक गोपीगणीक श्रीकृष्ण झाला. "भगवंताचा मी" ही जाणीव पाहिजे. त्या जाणीवेकरता नाम घ्यावे.
मनुष्य निमित्ताला कारण आहे. पुष्कळ वेळा थोड्या प्रयत्नात यश मिळते. काही वेळा उलट होते. यश मिळाले तर मनुष्य शहाणा ठरतो नाहीतर वेडा ठरतो. दोन्हीही खरे नाही.
अमुक प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. फळ भगवंताकडे आहे.
निष्ठा ठेवून थोडे नाम घेतले तर अनुभव आल्याखेरीज राहणार नाही.
नाम घेणे खरे भाग्याचे लक्षण आहे. नाम घेतो तो मला पूज्य आहे.
निष्ठा हीच समाधानाची जागा आहे. ती नाही तोपर्यंत समाधान नाही.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment