🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - १८१
प्रेम निस्वार्थी पाहिजे. ते भगवंताशिवाय नाही. आपण स्वार्थाने लडबडलेले आहोत. प्रेम निर्माण करायला आपला स्वार्थाचा पिंड आड येतो.
सहवासाने बिघडते तसे सुधारते पण. सहवासासाठी एक गोष्ट दोन्ही ठिकाणी असली पाहिजे.
भगवंताला जे टाकता येणार नाही व आम्हाला धरता येईल अशी वस्तू पाहिजे. अशी वस्तू असल्यास भगवंत हातात येईल. त्याने सहवास होईल व प्रेमही येईल. सहवासाचे प्रेम आपण करीत आलो आहोत.
अशी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम जे अगदी त्याच्याजवळ आहे. जेथे नाम तेथे मी आहे असे भगवंतानेच सांगितले आहे.
त्याला नीतीचे आसन डळमळता उपयोगी नाही.
शेवटी सर्व विसरा पण भगवंताचे नाम विसरू नका.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment