17 Apr 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - १८८


हिंदुस्थानात अध्यात्माचा दुष्काळ पडणार नाही. भगवंताचा वरदहस्त आहे.


तो आहे तेथे पैसे कमीच असणार. पण भगवंत पाहिजे का पैसा पाहिजे ते ठरवावे.


भगवंतावाचून भाग्य नाही. त्याच्या नामात रहावे ते शेवटपर्यंत येते.


चांगल्या माणसाची दृष्टी कर्तव्याकडे असावी. फळाकडे नसावी.


इतके करील त्याचा प्रपंच भगवंत चालवील. भगवंताने जन्माला घातले तर त्याच्याकडे चालवायचे आहेच.


मनुष्याचा स्वाभाविक कल भगवंताकडे आहे. प्राण्यापेक्षा त्याला विशेष ज्ञान असते. त्याने भगवंताकडे जावेसे वाटते.


व्यवहाराला धरुन प्रयत्न करावा व मनाने परमेश्वरावर निष्ठा ठेवावी.


नामात राहणे व्यवहाराच्या आड येत नाही.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: